नंदुरबार l प्रतिनिधी-
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता. जि. नंदुरबार येथे उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत बीट स्तरीय केंद्रस्तरीय मेळावा उत्साहात संपन्न झाला.
विद्यालयात उल्हास नवभारत साक्षरता अभियान २०२२ ते २०२७ अंतर्गत केंद्रस्तरीय मेळावा घेण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विस्तार अधिकारी सौ.रेखा पानपाटील, केंद्रप्रमुख कल्पेश गोसावी, कोपर्लीचे केंद्रप्रमुख सोनार, पदोन्नती मुख्याध्यापक पाटील , प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, माजी पर्यवेक्षक पी.पी.बागुल, पर्यवेक्षक एम. बी. आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून नव साक्षरता अभियानाचे महत्त्व विशद केले नंदुरबार जिल्ह्यातील नव साक्षरता अभियाना संदर्भात होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. नव साक्षर भारत अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे मेळाव्यात दहा स्टॉल लावण्यात आले होते यात शिक्षकांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू व शैक्षणिक साहित्याची निर्मिती यांची मांडणी करण्यात आली होती. स्टॉलचे उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पथनाट्य, लोकगीते ,नाटिका, इत्यादीचे सादरीकरण केले. भालेर व कोपर्ली केंद्रातून सर्व जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील एकूण ३५ शाळांनी सहभाग नोंदवला. शिक्षक- बंधूंनी नव साक्षरांसाठी तयार केलेल्या साहित्याची प्रदर्शन घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.व्हि.ईशी, सौ.सी.व्हि.पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ,पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.