नंदुरबार l प्रतिनिधी-
दि. 4 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय परख सर्वेक्षण (NAS) 2024 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन यशस्वीरीत्या पार पडले. देशभरात एकाच वेळी आयोजित या सर्वेक्षणात नंदुरबार जिल्ह्यातील 128 शाळांमधून 3,480 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यात नंदुरबार तालुक्यातून 37 शाळांतील इयत्ता ३ री चे 307, इयत्ता ६ वि चे 635 व इयत्ता ९ वि चे 343 असे एकूण 1015 विद्यार्थी सहभागी झाले.
नवापूर तालुक्यातून 18 शाळांतील इयत्ता ३ री चे 133, इयत्ता ६ वि चे 163 व इयत्ता ९ वि चे 208 असे एकूण 504 विद्यार्थी सहभागी झाले.
तळोदा तालुक्यातून 9 शाळांतील इयत्ता ३ री चे 19, इयत्ता ६ वि चे 60 व इयत्ता ९ वि चे 175 असे एकूण 254 विद्यार्थी सहभागी झाले.
शहादा तालुक्यातून 35 शाळांतील इयत्ता ३ री चे 314, इयत्ता ६ वि चे 306 व इयत्ता ९ वि चे 350 असे एकूण 970 विद्यार्थी सहभागी झाले.
धडगाव तालुक्यातून 8 शाळांतील इयत्ता ३ री चे 101, इयत्ता ९ वि चे 86 असे एकूण 187 विद्यार्थी सहभागी झाले.
अक्कलकुवा तालुक्यातून 21 शाळांतील इयत्ता ३ री चे 150, इयत्ता ६ वि चे 161, व इयत्ता ९ वि चे 239 असे एकूण 550 विद्यार्थी सहभागी झाले. असे संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 128 शाळांतील इयत्ता ३ री चे १०२४ इयत्ता ६ वि चे १०५५ व इयत्ता ९ वि चे १४०१ असे एकूण १२८ शाळांतील ३४८० विद्यार्थी सहभागी झाले.
या सर्वेक्षणादरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रावर भेट देऊन सर्वेक्षण प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. भरती बेलन आणि शिक्षणाधिकारी (प्राथ) श्रीमती वंदना वळवी, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रवीण देवरे यांनी तालुक्यातील विविध केंद्रांना भेटी देऊन सर्वेक्षण प्रक्रियेत मार्गदर्शन केले.
या सर्वेक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन व श्री विनोद लवांडे यांनी जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, प्रदीप पाटील, सुभाष वसावे, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, युनुस पठाण यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी सर्वेक्षण चोखपणे पार पाडण्यासाठी केंद्रांना भेटी दिल्या.
NAS 2024 परख सर्वेक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन करणे असून, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे तयार करण्यात येतील. जिल्ह्यातील शिक्षक, प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने नंदुरबार जिल्ह्यातील हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.