नंदुरबार l प्रतिनिधी-
घोड्यांच्या बाजारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या सारंखेडा यात्रा उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षेतेखील सारंगखेडा यात्रा सन -2024 यात्रा कालावधी करावयाच्या उपाययोजना, खबरदारी बाबत सारंगखेडा येथील श्री. दत्त मंदीर सभागृह या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार,उपविभागीय अधिकारी, शहादा भाग, शहादा, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची दिनांक 14.12.2024 पासून सुरु होणाऱ्या यात्रा कालावधीत विभागनिहाय करावयाच्या उपाय योजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस श्री. दत्त मंदीर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व इतर मान्यवर, चेतक फेस्टीवल चे आयोजक जयपालसिंह रावल, ग्रामस्थ, पत्रकार बांधव उपस्थित होते.
सदरच्या बैठकीस जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना यात्राकालावधी करावयाच्या उपायोजनासाठी आपल्या विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करने, यात्रा कालवधीत येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील यासाठी नियोजन करणे, प्रामुख्याने महारष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनी सर्व विद्युत पुरवठा व्यवस्थित होईल यासाठी नियोजन करणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करणे, अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग यांनी यात्रा कालावधीत लावण्यात येणऱ्या सर्व खाद्य पदार्थ विक्री दुकाने यांना परवाने देणे,
खाद्य पदार्थांचे नमूने घेणे, ग्रामपंचायत सारंगखेडा यांनी स्वच्छता पाणी पुरवठा आदी कामे, आरोग्य विभागाने रुग्ण वाहिका, औषध साठा, फवारणी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देणे, सर्व दुकानांच्या ठिकानी अग्निशामक यंत्र बसविणे, नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी दोंडाईचा नंदुरबार या ठिकनी संपर्क साधून फिरत शौचालय व अग्निशामक वाहने उपलब्ध करुन द्यावी, सार्वजनिक बांधकाम यांत्रिक, विद्युत विभाग यांनी यात्रा सुरु होणेपुर्वी त्याठिकाणी लावण्यात येणारे यंत्रसामुग्रीची तपासणी करणे महसूल व पोलीस विभाग यांनी समन्वयाने सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जबाबदारी पार पाडावी अशा सूचना दिल्या.