Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे, या दाढीला हलक्यात घेवू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

team by team
November 18, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे, या दाढीला हलक्यात घेवू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार l महेश पाटील

तुम्हाला रस्त्यावर उतरणारे सरकार पाहिजे की फेसबूकवर चालणारे सरकार पाहिजे. असे सांगत
अक्कलकुवा विधानसभेचा आमदार हा मुंबईत असतो.मग अशा आमदाराचे इथे काय काम आहे. याआमदाराचे स्थलांतर करुन पाठवून दया. आमदार के. सी.पाडवी यांनी मुंबईतच मतदार संघ शोधला पाहिजे तिथे निवडणूक लढवली पाहिजे. बाप आमदार ,मुलगा खासदार,ही मक्तेदारी थांबवा असे सांगत महायुती असतांनाही माजी खासदाराने बंडखोरी केली आहे त्यांनाही हद़द़पार करा असा टोला माजी खासदार डॉ.हिना गावित यांना लगावला.महायुतीचेच सरकार राज्यात येणार आहे.तेव्हा बंडखोरी करणाऱ्यांना हद़दपार व्हावे लागणार आहे.महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे.या दाढीला हलक्यात घेवू नका,असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.धडगाव येथे शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचारार्थ् आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला रस्त्यावर उतरणारे सरकार पाहिजे की फेसबूकवर चालणारे सरकार पाहिजे. आम्हाला खुप करायचे आहे.गोर गरीबांच्या जीवनात चांगले दिवस आणायचे आहेत,आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे,या गावात एमआयडीसी जाहीर करणार जेणे करुना इथल्या मतदारांना रोजगार उपलब्ध़ होईल, मतदार संघ एक नंबर आहे. मात्र विकासात शेवटचा नंबर आहे.इथल्या मतदारांनी आशिर्वाद दिले तर हा मतदार संघ विकासात एक नंबर करीन. बांबू लागवडीला सहा लाख रुपये एकरी दिले जातात.याचा लाभ घ्या, आचार संहिता संपल्यानंतर दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.
समोर कोण उभा आहे,किती पैसेवाला आहे,हे पाहू नका.या निवडणूकांमध्ये सुपडा साफ करुन टाका.आई देवमोगरा मातेच्या आशिर्वादाने धनुष्यबाणाला मतदान करा. मोलगीला तालुक्याचा दर्जा देणार,नर्मदेचे पाणी धडगावला आणण्यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केली मात्र त्याला खोडा घालण्यात आला.ज्यांनी खोडा घातला अशांनाही जागा दाखवा.विकासाचा अजंडा आम्ही पुढे नेतो आहे,रक्ताचा शेवटचा श्वास असे पर्यंत मला जनतेची सेवा करायची आहे.,असेही शिंदे यांनी सांगितले. महायुतीची गाडी या एकनाथ शिंदे च्या दाढीमुळे खडडयात गेली आहे,मला हलक्यात घेवू नका असेही ते म्हणाले.

*एकदा शब्द दिला तो शब्द मी फिरवत नाही*

धडगाव येथे प्रचार सभे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकुवा विधानसभेचे आमदार के. सी.पाडवी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. त्यांनी सांगितले की, आमदार हा मुंबईत असतो.मग अशा आमदाराचे इथे काय काम, आमदाराचे स्थलांतर करुन पाठवून दया. निवडणूका आल्या की बाता मारायच्या आणि निवडणूक झाली की गायब व्हायचे हे थांबले पाहिजे.के सी पाडवी यांनी मुंबईतच मतदार संघ शोधला पाहिजे तिथे निवडणूक लढवली पाहिजे. असं सांगत

 

 

ही सिट निवडून आल्यास चंद्रकांत रघवूंशी यांना आमदार व विजयसिंग पराडके यांना महामंडळाचे अध्यक्ष करु, असा शब्द़ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगाववासिंयाना दिला. मी एकदा शब्द़ दिला तो शब्द़ मी फिरवत नाही असेही त्यांनी सांगितले.

 

हा मतदार संघ शिंदेच्या झोळीत टाकण्याचे आश्वासन रघूवंशी यांनी दिल्याने त्या मोबादल्यात चंद्रकांत रघूवंशी यांना विधान परीषदेचे तिकीट देण्यात येणार असल्याच्या डिलवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवी यांना विविध सामाजिक संघटनांच्या पाठिंबा

Next Post

महिला सक्षमीकरणावर देणार भर:डॉ.हिना गावित,दुर्गम भागात कॉर्नर सभांना प्रतिसाद

Next Post
महिला सक्षमीकरणावर देणार भर:डॉ.हिना गावित,दुर्गम भागात कॉर्नर सभांना प्रतिसाद

महिला सक्षमीकरणावर देणार भर:डॉ.हिना गावित,दुर्गम भागात कॉर्नर सभांना प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add