नंदुरबार l प्रतिनिधी
नगाव ता.जि.नंदुरबार येथील असंख्य तरुणांचा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच भालेर गावाचे मा.सरपंच सौ. बेबिबाई भास्करराव पाटील, प्रल्हाद बागुल , चंद्रशेखर पाटील , नगाव चे मा. सरपंच शानाभाऊ धनगर , हर्षल पाटील ,भाजपा कार्यकर्ते रमेश पाटील , आनंदा पाटील , अभिमन्यू पाटील, पी.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रम नगाव तालुका नंदुरबार येथे संपन्न झाला.