नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान जनजागृती (SVEEP) उपक्रमासाठी 4 गटांमध्ये मॅराथॉन व वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन नंदुरबार शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ स्वीप चा झेंडा तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, नंदुरबार तालुक्यातील केंद्रप्रमुख, नंदुरबार व तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक असे एकूण 275 स्पर्धक तसेच 18 शाळांमधुन 1200 विद्यार्थी व विद्यार्थीनी स्पर्धेत सहभागी झाले होते.
शहर पोलीस स्टेशनच्या समोरील पोलीस परेड मैदानापासून सदर स्पर्धेस सुरुवात होऊन नेहरू चौक- नगरपालिका- अंधारे चौक- स्टेट बॅक या मार्गे श्रॉफ हायस्कुल च्या पटांगणात स्पर्धेचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना व अन्य सहभागी स्पर्धकांना कॅडबरी व चॉकलेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य, निवडणूक गीत सादर करण्यात आले. तसेच उपस्थितांना मतदानाची शपथ देऊन स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
*स्पर्धेतील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे स्पर्धेत जिल्हाधिकारी मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार हे सर्व स्पर्धकांच्या शेवटी स्पर्धेच्या सुरुवातीच्या स्थळापासुन ते स्पर्धेच्या समारोपाच्या ठिकाणापर्यंत पुर्ण वेळ उत्साहाने धावले.
*गटनिहाय विजेत्या स्पर्धकांची नावे-*
*विद्यार्थी गट-*
प्रथम क्रमांक- मयुर राजेंद्र धनगर डी.आर. हायस्कुल, नंदुरबार
द्वितीय क्रमांक- मानसिंग ढेमश्या वसावे मिशन हायस्कुल, नंदुरबार
तृतीय क्रमांक- रोशन सायसिंग पाडवी एकलव्य विद्यालय, नंदुरबार
चतुर्थ क्रमांक- लकी रविंद्र ठाकरे एकलव्य विद्यालय, नंदुरबार
पाचवा क्रमांक- रोहित गजानन राठोड मिशन हायस्कुल, नंदुरबार
*विद्यार्थीनी गट-*
प्रथम क्रमांक- सोनाली महारु पवार डी.आर. हायस्कुल, नंदुरबार
द्वितीय क्रमांक- प्रिया दिलीप वळवी पी.के. अण्णा पाटील हायस्कुल, नंदुरबार
तृतीय क्रमांक- निशा दिलीप वळवी डी.आर. हायस्कुल, नंदुरबार
चतुर्थ क्रमांक- दिपाली लक्ष्मण ठाकरे अभिनव विद्यालय, नंदुरबार
पाचवा क्रमांक- शितल उत्तम कोळी कमला नेहरू हायस्कुल, नंदुरबार
*पुरुष गट-*
प्रथम क्रमांक- प्रकाश गवळे डी.आर. हायस्कुल, नंदुरबार
द्वितीय क्रमांक- सुनिल गिरासे श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
तृतीय क्रमांक- महेश पाटील श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
चतुर्थ क्रमांक- नरेंद्र सुर्यवंशी श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
पाचवा क्रमांक- वैभव गवळी श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
*महिला गट-*
प्रथम क्रमांक- वर्षा घुले कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार
द्वितीय क्रमांक- गायत्री पाटील श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
तृतीय क्रमांक- तिलोत्तमा चौधरी अभिनव विद्यालय, नंदुरबार
चतुर्थ क्रमांक- मनिषा कलाल श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार
पाचवा क्रमांक- हर्षदा पाटील अभिनव विद्यालय, नंदुरबार