Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुर्गम महिला मतदारांमध्ये डॉ. हिना गावित यांचीच क्रेझ; विक्रमी गॅस वाटपामुळे ‘शेगडी’ चिन्हाची चालतेय जादू

team by team
November 13, 2024
in राजकीय
0
दुर्गम महिला मतदारांमध्ये डॉ. हिना गावित यांचीच क्रेझ; विक्रमी गॅस वाटपामुळे ‘शेगडी’ चिन्हाची चालतेय जादू

नंदुरबार l प्रतिनिधी-

आपण एक असा आमदार अनुभवला ज्यांना 35 वर्षात कोणताही विकास करता आला नाही. परंतु खासदार म्हणून मला संधी दिली तेव्हा मी या भागात रोजगारापासून सोयीसुविधांपर्यंत सर्व दिले. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा धडगाव चा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा त्याच विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारून मला संधी द्यावी तुम्ही परिवर्तन कळवा मी या भागाचा कायापालट घडवून दाखवेन; असे आवाहन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले.

 

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार आणि एक माजी खासदार असा चौरंगी सामना रंगला आहे. मात्र अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी खासदार असताना धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांच्या समोर आहे त्यामुळे सध्या गाव पाड्यांमधून चालू असलेल्या त्यांच्या प्रचार फेऱ्यांना आणि कॉर्नर सभांना इतर उमेदवारांच्या तुलनेत मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. विशेषतः महिला बचत गटातील लाभार्थी महिला, गॅस शेगडी वाटपासारख्या योजनांच्या लाभार्थी महिलांचा मोठा प्रतिसाद आहे.

 

ज्या ज्या गावांना डॉक्टर हिना गावित यांच्यामुळे काँक्रीट रस्ते पक्के रस्ते मिळाले त्या भागातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्कात येत असून विजयाची हमी देत आहेत.

 

दरम्यान कॉर्नर सभांमधून आवाहन करताना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या, आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला खासदार बनवण्याचे सौभाग्य लाभले. त्या दहा वर्षात एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्यथा, वेदना, समस्या सोडवण्यालाच प्राधान्य दिले आणि अक्कलकुवा धडगाव तालुक्यात विक्रमी स्वरूपात गॅस वाटप केले, महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात उपाययोजना केल्या. रस्ते विकास केला, अस्तंबा आणि सावऱ्या दिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम भागाला पूल, काँक्रीट रस्ते मिळवून दिले. खासदार असतांना दुर्गम-अतिदुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत.

 

 

केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणून येथील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी जनता संधी देईल, असा विश्वास डॉ.हिना गावित यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

आमच्या विरोधी उमेदवाराने कोणते राजकीय आणि विकासात्मक योगदान दिलंय? डॉ. विजयकुमार गावित यांचा प्रश्न

Next Post

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेरीने नंदुरबार शहरात बनले भाजपा महायुतीमय वातावरण

Next Post
डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेरीने नंदुरबार शहरात बनले भाजपा महायुतीमय वातावरण

डॉ.विजयकुमार गावित यांच्या झंजावाती प्रचार फेरीने नंदुरबार शहरात बनले भाजपा महायुतीमय वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add