नंदुरबार l प्रतिनिधी-
विकास कार्यात त्याचप्रमाणे राजकारणात योगदान असलेला तुल्यबळ उमेदवार आमच्या विरोधकांना देता आलेला नाही केवळ भ्रष्टाचाराचे गणित ठेवून ते प्रत्येक कृती करतात हे पुन्हा स्पष्ट झाले, असे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रतिपादन केले. नंदुरबार विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या शहादा तालुक्यातील नांदरखेडा, पळसखेडा, वर्धे टेंभे सजदेबर्डी सजदे शेल्टी, लांबोळा धुरखेडा भादे पिंगाणे मनरद आणि अन्य गावांमध्ये संपर्क केला. या प्रत्येक गावात कॉर्नर सभा घेऊन त्यांनी संवाद साधला. या प्रसंगी ते बोलत होते.
भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, या अनुषंगाने माझे मतदार बंधू भगिनींना नम्र आवाहन आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या गोष्टी प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. मतदारांना संभ्रमित करण्यासाठी आमचे विरोधक याचा गैरफायदा उठवत आहेत. प्रसारित केल्या जाणाऱ्या त्या खोट्या गोष्टींच्या आहारी जाऊन भूमिका बनवणारे मतदार वाढल्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत निराळी आहे. चुकीच्या जागी मतदान केले तर मतदारसंघ दहा वर्ष मागे जातो हे आता लोकसभा निवडणुकीत आपण पाहिले. तेव्हा, भूल थापा देणारे, खोटे बोलून दिशाभूल करणारे यांना बळी पडायचे नाही, याचा निश्चय करा. आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा विकास खरोखर कोणी केला हे पाहून मतदान करा, असेही ते म्हणाले.
त्यांच्या समावेत ज्येष्ठ नेते दिपक पाटील,जि.प.बांधकाम सभापती सौ.हेमलता शितोळे,जि.प.सदस्य के.डी.नाईक,भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल,रविंद्र राउळ,प्रशांत चव्हाण,उमेश पाटिल,रामराव बोरसे,संजय भदाणे,तुळशीराम कोळी,सुनील कुवर,कृष्णा कोळी,दिलवर माळचे यांच्यासह परिसरातील सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते होते.
दरम्यान, आमच्या प्रमाणे अनेक जण लहानपणापासून ऐकत आले आले होते आणि पाहत होते की नंदुरबार जिल्ह्यात एकाधिकारशाहीचे दडपशाहीचे राजकारण होते. परंतु त्यात बदल घडवून आणणारे खरे परिवर्तनीय राजकारण करीत संपूर्ण जिल्ह्याला प्रगतीपथावर आणले ते एकमेव नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी. सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात एवढं मोठं योगदान देणारा दुसरा कोणताही उमेदवार विरोधकांना मिळालेला नाही. भाजपा महायुतीने मात्र मतदारांसाठी विकास कार्याला वाहून घेतलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासारखे नेतृत्व उभे केलेले आहे म्हणून मतदारांनी त्यांनाच मताधिक्याने विजयी करावे; असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सातत्याने संपर्क करीत आहेत. त्या अंतर्गत आज सोमवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी कोळदे जिल्हा परिषद गटातील होळ तर्फे हवेली, उमर्दे खु., दहिंदुले, धामळोद, कलमाडी, भागसरी, बामडोद, वरूळ, खोडसगाव, लहान शहादा, शिंदे, पळाशी, कोळदा आणि अन्य गावात संपर्क केला. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील यांच्यासह सर्व प्मुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक
मान्यवर उपस्थित होते.