Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवडणुक प्रचारात ध्वनिक्षेपकासाठी पोलिस परवानगी घेणे आवश्यक : डॉ. मित्ताली सेठी

team by team
October 22, 2024
in राज्य
0
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत, पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा निवडणूक कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

 

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे याबाबत निर्बंध घालणे आवश्यक आहे.

 

 

त्यानुसार जिल्हादंडाधिकारी श्रीमती डॉ. सेठी यांनी मुंबई पोलिस अधिनियमानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधानुसार ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी सहा वाजेपूर्वी आणि रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरीता वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकी पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती डॉ. सेठी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस स्मृती दिनी शहीदांना जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना

Next Post

शहादा तालुक्यात पोलिसांनी शेतात धाडी टाकून 24 लाखाचा गांजा केला जप्त

Next Post
शहादा तालुक्यात पोलिसांनी शेतात धाडी टाकून 24 लाखाचा गांजा केला जप्त

शहादा तालुक्यात पोलिसांनी शेतात धाडी टाकून 24 लाखाचा गांजा केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add