नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमाताई वळवी यांना दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.तसेच निवेदनाची प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.रा.गायकवाड,जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप, ई-मेल द्वारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू , प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष विकास घुगे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर माहे ऑक्टोबर पेड नोव्हेंबर प्राथमिक शिक्षकांचे वेतन,दिवाळी ॲडवांस दि.१ नोव्हेंबर २०२१ पूर्वी करण्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी केली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी राज्यात शालार्थ प्रणाली सुरु करण्यात आली आहे . शालार्थ प्रणालीचे पूर्णपणे कार्यान्वयन अद्यापही शासन स्तरावरून होऊ शकले नाही.सर्व कर्मचारी,शिक्षकांचे दरमहा वेतन , दिवाळी बोनस १ तारखेला शासनाच्या धोरणात्मक निर्णय असूनही याबाबत अनेकदा शासन स्तरावरून आदेशही निर्गत झाले आहे.मात्र जिल्ह्यातील जि.प.प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत १ तारखेला वेतन केवळ दिवास्वप्नच ठरले आहे.एक तारखेला जिल्ह्यात वेतन होत नसून जिल्ह्यातील जि.प.प्राथमिक शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी आणि अनेकदा देय महिना संपल्यापश्चात होत आहे.याबाबत सातत्याने प्रशासनाकडे मागणी करूनही , शिक्षकांच्या वेतनारा होणारा विलंब थांबलेला नाही.वेतन अनुदान वितरण अत्यांतिक विलंबाने होणे आणि प्राधिकृत अधिकाराच्या स्वाक्षरीचे शाई व जिल्हा परिषदेला मिळण्यासाठी होणारा विलंब स्तरावर संबंधित शिक्षण विभाग,जिल्हा परिषद वित्त विभाग आणि कोषागार विभागाची उदासीनता शिक्षकांच्या वेतनास अधिक विलंबाचे कारण ठरत असून त्यात संबंधित बँकाही विलंबास हातभार लावतात असा सार्वत्रिक अनुभव आहे . मात्र वेतनास विलंब टाळून दरमहा १ तारखेला वेतन होण्यासाठी शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नाही हे वास्तव आहे. पगार उशिरा होत असल्यामुळे काही शिक्षकांचे गृहकर्ज,वाहनकर्ज व इतर कर्ज विमा हप्ते असल्यामुळे सदर हप्ते वेळेवर न भरल्यास त्यांना दंड स्वरुपात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.२ नोव्हेंबरपासून दिवाळी सणोत्सवास सुरुवात होत आहे . दिवाळी लक्षात घेऊन ऑक्टोंबर देय नोव्हेंबर महिन्याचे प्राथमिक शिक्षकांचे वेतन किमान या महिन्यातरी दिवाळी अॅडवान्स १ नोव्हेंबर रोजी पूर्वी होईल अशी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेकडून रास्त अपेक्षा आहे.अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी केली आहे.








