Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

team by team
September 25, 2024
in राजकीय
0
उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

नंदुरबार l प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी वास्तव्यास असलेल्या गावांना व आदिवासी समाजाच्या कुटूंबाना विविध योजनांचा लाभ प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियांनाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

केंद्र शासनाने देशातील आर्थिक-सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षित जिल्ह्यामधील आदिवासी कुटुंबाची परिपूर्ती करण्यासाठी “प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियान” योजनेस मंजूरी दिली असून या योजनेसाठी आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वागिण आणि शाश्वत विकासाची खबरदारी घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

 

 

 

यामध्ये आदिवासी समाज ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटूंब व लाभार्थ्याच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, मोबाईल मेडिकल युनिट, उज्वला गॅस योजना, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोषण स्थिती सुधारणे, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, कृषि विभागाच्या योजनांचा लाभ देणे, मत्सव्यवसाय करण्यास चालना देणे, पर्यटनाचा विकास करणे, शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी विविध प्रकारचे लाभ देण्याची कार्यवाही पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे.

 

 

एकूण 17 विभागामार्फत 25 उपक्रमांचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे आदिवासी बहुल गावांचा सर्वागिण विकास होवून समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे.

यासाठी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा व या अभियानात सहभागी व्हावे असेही श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

Next Post

जिल्हा परिषदआवारात ‘एक पेड मा के नाम ‘अंतर्गत वृक्षारोपण

Next Post
जिल्हा परिषदआवारात ‘एक पेड मा के नाम ‘अंतर्गत वृक्षारोपण

जिल्हा परिषदआवारात 'एक पेड मा के नाम 'अंतर्गत वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add