नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा सनियंत्रन अर्थात दिशा समिती ची बैठक घेण्यात येणार होती या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना आणि निधी या संदर्भात या समिती मध्ये ३५ विभागांचा आढावा घेतला जात आसतो या बैठकी संदर्भात खासदार पाडवी यांनी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाला पत्र दिले होते या बैठकी संदर्भातील माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात न आल्याने खासदार गोवल पाडवी आक्रमक झाले होते
त्यांनी बैठक तहकूब करून माहिती पूर्ण आल्यावर पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर करत सभा तहकूब केली.
या वेळी जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांनी माहिती अद्यावत का केली नाही बैठकीसाठी न आलेल्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली .
या बैठकीत प्रशासनातील ३५ विभागांचा आढावा घेण्यात येणार होता मात्र फक्त १३ विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती तर तब्बल २२ विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहितीची पूर्तता केली नव्हती त्यामुळे कोणती कामे झाली आहेत या संदर्भातील माहिती नसल्याने आढावा कसा घ्यावा असा प्रश्न खासदार गोवाल पाडवी आणि समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला या नंतर आक्रमक होत खासदारांनी बैठक तहकूब करत सभागृह सोडले .
दिशा समितीची बैठक तहकूब झाल्या नंतर त्याच सभागृहात जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली बैठकीसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नमुन्यात माहिती भरून उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला येताना परिपूर्ण माहिती सोबत आणावी.