नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पक्षाचे माजी सरपंच संजयसिंग इंद्रसिंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे गुच्छ देऊन स्वागत केले. शिंदे गटात दाखल झालेले राऊळ गेल्या १५ वर्षांपासून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटात होते.
नंदुरबार येथे आमदार कार्यालयात प्रवेशाच्या कार्यक्रम झाला. मांजरे ता. नंदुरबार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजयसिंह राऊळ यांनी गेल्या महिनाभरापूर्वी भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर काल शुक्रवारी शेकडो ग्रामस्थांसह ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य प्रेमसिंग राऊळ, दिनेश गिरासे,मोहनसिंग गिरासे, सुनील ठाकरे, जयपालसिंह राऊळ, भीमराव पाटील, रामसिंग भिल,किरण भिल,अमोल राऊळ, रणजीतसिंग राऊळ शेकाडोंवर ग्रामस्थांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, जि प माजी अध्यक्ष वकील पाटील, निझर बाजार समिती चेअरमन योगेश राजपूत, रमेश पाटील,गणेश पाटील, समाधान पाटील,भारत पाटील,बळीराम पाटील नारायण पाटील,उमरसिंगराव राऊळ,प्रकाश भील आदी उपस्थित होते.