नंदुरबार l प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात आत्मविश्वासात वाढ व्हावी व नकारात्मकतेचा लय होण्याची भावना निर्माण होणे अत्यावश्यक असते.या हेतूने श्राॅफ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा अथर्वशीर्ष पठणाचा सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला.अडीच हजार विद्यार्थ्यांनी मंगल स्तोत्रांचे गायन केले.
श्राॅफ हायस्कूलमध्ये गणेश पर्व उत्सव साजरा केला जातो आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्य रुजवून त्यांच्या विविध पैलूंना प्रकाशित करण्याचा प्रयत्न शाळेतर्फे केला जातो आहे.
विद्या ग्रहणाच्या पवित्र प्रवासात अथर्व शीर्षाचे महत्व विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे. गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने जीवनात होणारी सर्वांगीण प्रगती,समृद्धी येते,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात,विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात. या भावनेने संस्कृत भाषा अभ्यास ज्येष्ठ शिक्षक योगेश शास्त्री यांनी अथर्वशीर्षाचे पठण विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
यावेळी उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक जगदीश पाटील, सिमा पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले.