Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिशन कवच कुंडल’ मोहिम यशस्वी करण्यासाठी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
October 12, 2021
in आरोग्य
0
मिशन कवच कुंडल’ मोहिम यशस्वी करण्यासाठी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी-
‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेतंर्गत सुरु करण्यात आलेली लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी गाव, पाडे, तालुका तसेच प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यानी दिले.
जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ. राजेश वसावे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती खत्री म्हणाल्या की, 8 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात येत असून लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी  लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करावे यासाठी आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. लहान गावात 100 टक्के लसीकरण करावे त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट देण्यात यावेत.
धडगाव तसेच अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी गावनिहाय शिबीरांचे आयोजन करावे. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करावी. जिल्हा  रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. नगरपालिका, नगर पंचायतक्षेत्रात शिबीराचे आयोजन करावे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी त्याचप्रमाणे नियोजनबद्ध काम करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी  नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यासोबतच लसीकरणही करून घ्यावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी यावेळी केले.
बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-19 लसीकरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या रथास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या जनजागृतीपर रथामार्फत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करण्यात येणार असून अतिदुर्गम भागातील  नागरिकांना लसीकरणासाठी शिबीरात घेवून जाण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पिरॅमल स्वास्थ्यचे निलचंद्र शेंडे यांनी यावेळी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे घरफोडी प्रकरणी सहा विधी संघर्ष बालकांकडून मुद्देमाल हस्तगत

Next Post

नंदुरबार शहरात रावण दहनाचा कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द

Next Post

नंदुरबार शहरात रावण दहनाचा कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add