नंदुरबार | प्रतिनिधी
अहमदाबाद ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळ नंदुरबार जिल्हा व संत सावता महाराज भजनीमंडळ सुरत यांच्यातर्फे खा.डॉ.हिना गावित यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गुजरात राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील नागरिक कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी व अन्य कारणांसाठी गुजरात राज्यात गेले आहेत.तेथे सदरची कुटुंबे पन्नास वर्षाहून अधिक वास्तव्य करीत आहेत. गुजरात राज्यात अंदाजीत २० ते ३० टक्के महाराष्ट्रातील नागरिकाची लोकवस्ती आहे यात वारकरी संप्रदायाचे भक्ती स्थान व प्रेरणास्थान तसेच महाराष्ट्रातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर या तीर्थक्षेत्रावर त्यांना दर्शन घेण्यासाठी जावे लागत असते.पंढरपूर जाण्यासाठी सद्यस्थिती गुजरात राज्यातून कोणत्याही स्वरूपाची रेल्वे सुविधा या वारकरी सांप्रदाय यांसाठी उपलब्ध नाही. यासाठी गुजरात राज्यातील वारकरी संप्रदायाच्या नागरिकांना बसचा प्रवास परवडत नसल्यामुळे गुजरात राज्यातील अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून अहमदाबाद ते पंढरपूर या रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. या अनुषंगाने या वारकरी संप्रदायाच्या भक्तांनी गुजरात राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींना व रेल्वे अधिकार्यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहेत.सदरच्या मागणीचे निवेदन खा.डॉ.हिना गावित यांनादेखील वारकरी संप्रदायाच्या भक्तांनी आज त्यांच्या निवासस्थानी दिले आहे निवेदनानंतर वारकरी संप्रदायाच्या नागरिकांनी आपण त्यांना होणारी अडचण खासदारांकडून मांडली लवकरच आपली अडचण दूर करून अहमदाबाद पंढरपूर रेल्वेसाठी रेल्वे विभागाच्या अधिकार्यांशी बोलणं करून सुरू करण्याचे आश्वासन यावेळी खा.डॉ. हिना गावित यांनी उपस्थित वारकरी संप्रदायाच्या नागरिकांना दिले.यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष. हभप रामकृष्ण महाराज भोणेकर , अखिल भारतीय वारकरी मंडळ नंदुरबार ता.अध्यक्ष पंडित लक्ष्मण बोरसे, संत सावता वारकरी मंडळ सुरत चे अध्यक्ष नामदेव महाराज, सागर तांबोळी, वासुदेव माळी, जगदिश पाटील, भजनी जेष्ठ वारकरी भजनी हभप विनायक पाटील,हभप गोविंदा रावी, हभप वसंत पाटील,हभप राजेंद्र बोरसे,हभप जागो माळी,हभप सदाशिव माळी,हभप जनार्दन माळी आदी उपस्थीत होते.








