Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोणताही निकाल अंतिम नसतो; यशासाठी परिश्रम व प्रयत्न आवश्यकच. आमदार राजेश पाडवी

team by team
August 27, 2024
in राजकीय
0
कोणताही निकाल अंतिम नसतो; यशासाठी परिश्रम व प्रयत्न आवश्यकच. आमदार राजेश पाडवी

म्हसावद । प्रतिनिधी:

राजकीय जीवनात कार्यरत असतांना सामाजिक बांधिलकीची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे. देव-देश आणि धर्माचा जागर करण्यासह कलावंतांचा सन्मान करण्यासाठीच भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रतिपादन शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी केले.

आ. राजेश पाडवी व कै. कलावतीताई पाडवी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भजन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा .मकरंद पाटील, भाजपाचे शहादा-तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, दिनेश खंडेलवाल,सतिष जव्हेरी, दामळद्याचे उपसरपंच डॉ .विजय चौधरी,योगेश पाटील, लगाण पावरा,छोटु शिदे,किशोर मराठे,घनश्याम मराठे,मणिष पवार,रमाशंकर माळी,मोहन आवासे,नवनाथ वाघ, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाडवी पुढे बोलतांना म्हणाले, कोणतीही स्पर्धा व तिचा निकाल हा अंतिम नसतो. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व परिश्रम आवश्यक असतात. भजन स्पर्धेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना आपल्या कलेचे प्रदर्शनास संधी उपलब्ध करून देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कलावंत व भजनी मंडळांसाठी शासनाच्या राजर्षी शाहू महाराज भजनी मंडळ अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.

मतदार संघातील सर्व घटकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी मयूरभाई पाटील, दिनेश खंडेलवाल, सौ.सुकन्या पाटील, विष्णू जोंधळे, सौ.नीलिमा पाटील, सुजितकुमार चौधरी, सचिन महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.चार दिवसीय भजन स्पर्धेत शहादा विधानसभा मतदारसंघातील 185 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.या भजन स्पर्धेत अभंग व एकतारी भजन या दोन प्रकारात स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मधुभाई पाटील, डॉ.एस.एस.भांडे, कुणाल खेडकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी केले. आभार लक्ष्मीकांत वसावे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमराज पवार,दिपक जयस्वाल, अनिल ठाकरे, मयूर बाविस्कर ,श्रीराम पाटील, विकी ठाकरे, प्रशांत कुलकर्णी,प्रितेश भावसार,सचिन पाटील, आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल असा:-

अभंग स्पर्धा –

प्रथम- संत मिराबाई महिला भजनी मंडळ,विद्याविहार

द्वितीय – नादब्रम्ह भजन मंडळ शहादा

तृतीय- श्री कृष्ण भजन मंडळ ब्राम्हणपुरी

एकतारी भजन स्पर्धा

प्रथम – हरीओम भजन मंडळ शहाणा

द्वितीय – सत्य धर्म भजन मंडळ,साबलापाणी

तृतीय – गुरुकृपा भजन मंडळ ,राणीपुर

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील जिल्हाधिकारीपदी डॉ.मिताली सेठी यांची नियुक्ती

Next Post

जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांचा आज नागरी सत्कार

Next Post
जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांचा आज नागरी सत्कार

जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांचा आज नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add