नंदुरबार l प्रतिनिधी
बदलापूर येथे झालेली घटनेच्या पाश्वभूमीवर नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकारचे शासकीय व खाजगी शाळा, इंग्लिश मेडीयम स्कुल येथे विद्यार्थिनी यांची सुरक्षितेबाबत उपायोजना करण्यात याव्या तसेच अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन विद्यार्थी भगिनींवार बलात्कार झाल्याची दुर्देवी घटना घडली, प्रथम त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहर तर्फे निषेधच आणि सदर आरोपीला प्रखर शिक्षा व्हावी. परंतु सदर प्रश्न हा त्या शाळेतील ज्या असुवेधे मुळे निर्माण झाला तशी असुविधा आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील काही खाजगी व शासकीय शाळा, इंग्लिश स्कुल येथे असल्याची माहीती आम्हाला मिळाली असून या सर्व खाजगी व शासकीय शाळा व स्कुल यांना तात्काळ विद्यार्थिनी सुरक्षे प्रती एक आदेश करून पुढील आठ दिवसाच्या आत विद्यार्थिनींना सुरक्षेसाठी. शाळा गेट, वर्ग खोली व प्रामुख्याने विद्यार्थिनी टॉयलेट जवळील प्रवेश द्वार एरिया येथे CCTV बसवायच्या उपाय योजना करणे तसेच काही शाळा व स्कुल मध्ये CCTV आहेत पण ते नादुरुस्त अवस्थेत आहेत ते दुसस्त करून पूर्वतत चालू करणे.तसेच प्रत्येक शाळा व इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थीनी यांच्या टॉयलेट जवळ एक महिला कर्मचारी यांची कायम नियुक्ती करण्याचि सक्ती करणे जेणे करून बदलापूरची घटनेची पुनरावृत्ती आपल्या जिल्ह्यात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच ज्या पोलीस कर्मचारी यांनी सदर प्रकरणात लवकर गुन्हा दाखल न करता कारवाई करायला दिरंगाई केली त्या पोलीस कर्मचारी यांच्या वर हि गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनास आदेशित करावे कि, अश्या स्वरूपाचा प्रकार आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
सर्व खाजगी व शासकीय शाळा, इंग्लिश स्कुल यांना आमलात आणण्यासाठी आजपासून 8 दिवसाचा अवधी देतो, आम्ही 8 दिवसानंतर प्रत्येक खाजगी व शासकीय शाळा, इंग्लिश स्कुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाऊन तपासणी करणार आहोत. तरी वरील मागणीची पूर्तता नसल्यास होणाऱ्या परिणामास जिल्हा प्रशासन, संबंधित खाजगी व शासकीय शाळा आणि इंग्लिश स्कुल यांचे संचालक मंडळ जबाबदार राहतील असा इशारा राष्ट्रवादी तर्फे देण्यात आला. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, शहराध्यक्ष मोहन माळी, कार्याध्यक्ष कमलेश चौधरी आदींच्या स्वाक्षरी आहेत .