म्हसावद । प्रतिनिधी:
शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसनचा ८ वर्षीय मुलगा चिखली बु शिवारात वडिलांसोबत स्वतःच्या शेतात गेले असता अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर एक तासात दुसऱ्या ९ वर्षीय बालका वर देखील हल्ला करून जखमी केल्याची घटना काल सायंकाळी घडली.
शहादा तालुक्यातील कुसूमवाडा परिसरात गेल्या महिन्या पासून बिबटयाने धुमाकूळ घातला असून त्याने परिसरात बकऱ्या वर हल्ला करून फस्त केल्या मात्र त्याने आता माणसावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. या बिबट्या ला पकडण्यासाठी वन विभागाने कुसुमवाडा येथे एका उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहे. मात्र तो पकडला गेला नाही मात्र काल 18 ऑगस्ट रोजी चिखली पुनर्वसन येथील एका लहान बालकांवर हल्ला करून जखमी केले.जखमी मुलगा
लवकुश या मुलावर बिबट्याने हल्ला केला, वडिल बारक्या पावरा हे सोबत असल्याने त्यांनी आरडा ओरड केल्याने मुलाला सोडवण्यात यश आले. बिबट्याच्या हल्ल्यात लवकुश बारक्या पावरा (९ वर्षे) हा मुलगा जखमी झाला.सदर मुलाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तर दुसरा मुलगा बारक्या तेलसिंग पावरा यास मांडीवर तीन दात गाडले आहे. त्याच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालत असून वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सदर बिबटयाने परिसरात धुमाकूळ घातला असून याबाबत वन विभागाला कळवून देखील बंदोबस्त केला नाही तरी या बिबट्या चा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक यांनी केली आहे.