नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत भालेर वडवद येथील ग्रामपंचायत कार्यालयावर सदस्य जिजाबाई आनंदा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच गजानन पाटील, सदस्य कविता पाटील, शोभा पाटील, प्रल्हाद पाटील, तलाठी महाले, डॉ. राकेश पाटील रेल्वे कर्मचारी राहुल पाटील, ग्राम विकास अधिकारी एस. पी .पाटील, सह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भालेर नगाव, तिसी विविध कार्यकारी सोसायटी
भालेर नगाव, तिसी विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारतीवर सोसायटीचे अध्यक्ष संतोष पांडुरंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेळी माजी अध्यक्ष हिम्मतराव पाटील, सचिव रफिक पिंजारी विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार तालुका समितीच्या शिवदर्शन विद्यालयात यांच्या साहेबराव माधवराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अध्यक्ष स्थानि उपसरपंच गजानन पाटील होते प्राचार्य आर. एस. बागुल, हिम्मतराव पाटील, सह भालेर,नगाव, तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जिल्हा परिषद केंद्र शाळा
जिल्हा परिषद केंद्र शाळा भालेर नगाव तिसी येथे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भालेरचे उपसरपंच गजानन पाटील नगावच्या सरपंच अनिता पाटील, तिसीचे सरपंच दिलीप पाटील मुख्याध्यापक पंकज वानखेडे आदी सह भालेर,नगाव, तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ, पालक कार्यक्रमास उपस्थित होते. नगाव ग्रामपंचायत नगाव ग्रामपंचायत कार्यालयावर सैनिकाची आई आशाबाई धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास सरपंच अनिता रवींद्र पाटील, विशाल पाटीलअधिकार धनगर,युवराज पाटील ,भटू पाटील,रोहिदास ठाकरे,डॉ शाम धनगर,नाना चव्हाण,शांताराम पाटील, वेडू पाटील,वामन पिंपळे, हिम्मत पाटील ,महादू गोसावी,विशाल पाटील आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालय शेजवा
नं. ता. वि. स. संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा ता. जि. नंदुरबार येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
विद्यार्थी विद्यार्थिनी शेजवा गावातून प्रभात फेरी काढली विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो , अशा विविध घोषणा दिल्या.
ध्वजारोहण शेजवा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच मुन्ना वसावे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक डी. एस .पाटील जि .प .सदस्य विश्वनाथ वळवी, ग्रामसेवक राजेंद्र चौरे , पो.पाटिल. योगेश वसावे, मानसिंग वसावे, तापसिंग वसावे ,शिवपूरचे माजी सरपंच सुधीर वळवी , जि.प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक गौतम पानपाटील ,मनोज कुमार चौधरी, राजेंद्र गावित, मदन पाडवी, सुभाष पाडवी, अशोक पाडवी, करमसिंग पाडवी, महेश वसावे, निलेश पाडवी, देविदास वसावे, दिलीप वसावे, चेतन वसावे, इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार दीपक वळवी यांनी मानले.