नंदुरबार l प्रतिनिधी
सेवाग्राम (जि.वर्धा) येथे दि.१६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान होणार्या २८ वी राज्यस्तरीय सबज्युनियर आणि ज्युनियर थांगता मार्शल आर्ट्स स्पर्धेसाठी येथील एस.ए.मिशन हायस्कूल मराठी माध्यम व इंग्लिश मिडीयम स्कूल येथील एकुण ७ खेळाडूंची (मुले-मुली) निवड करण्यात आली आहे. सदर खेळाडू आज दि.१५ ऑगस्ट रोजी वर्धाकडे रवाना होत आहेत.
ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशन व वर्धा जिल्हा थांगता मार्शल आर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ वी सब ज्युनियर आणि ज्युनियर स्पर्धा दिनांक १६ ऑगस्ट ते १८ सेवाग्राम जिल्हा वर्धा येथे घेण्यात येणार आहे. सदर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एस.ए.मिशन हायस्कूल मराठी माध्यम व इंग्लिश मिडीयम स्कूल येथील एकुण ७ खेळाडू मुला मुलींची निवड करण्यात आली आहे.
यात अभय मसराम, प्रणव गावित, सार्थक कलाल, भूमि मराठे, निधी पाटील, हृदया चौधरी, खुशी पाटील यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एस. ए.मिशन हायस्कूल व ज्यु कॉलेजच्या मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या पर्यवेक्षिका रोहिणी वळवी, क्रीडा शिक्षक मिनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, ऑल नंदुरबार जिल्हा थांग ता असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे आदी उपस्थित होते.