नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यात अवैधरीत्या महाराष्ट्र राज्यातून दारूची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचत किलवनपाड्यात साडेचार लाखांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे.
निलेश भरत गावीत यांचा घरी घरात छापा टाकला असता सुमारे 4 लाख 33 हजार 200 रुपये किंमतीचा विदेशी दारु व बिअर तसेच टिंकुकुमार नितेश्वरसिंग राजपुत राहणार लखाणी पार्क नवापुर याची झडती घेतली असता सुमारे पाच रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण 4 लाख 38 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
गुजरात राज्यात अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने नवापुर तालुक्यातील किलवणपाडा गावात निलेश भरत गावीत यांचा घरात मोठ्या प्रमाणात विदेशी दारु व बिअर मध्ये साठा मिळून आला. नवापूर पोलिसांनी 15 ऑगस्ट च्या मध्यरात्री कारवाई करत दोन जणांवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाठक आदींनी केली आहे. नवापूर पोलीस सलग अवैध दारूच्या कारवाई करीत आहे तरीदेखील नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दारू तस्करीची साधी भनक लागत नाही यावरूनच त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ?