नंदुरबार l प्रतिनिधी
15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन पी.एस कोल्हे, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन विवेक गुंड पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण कुमार देवरे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग संजीव कुमार पवार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अजय पाटील, सहाय्यक आयुक्त तपासणी आर एम पाटील,
जिल्हा आरोग्य अधिकारी आर बी सोनवणे, शिक्षण अधिकारी प्राथमिक वंदना वळवी, शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रवीण कुमार अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभाग कृष्णा राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेतील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आला.