नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अपूर्वा किसन गवळी (बाचलकर ) हिने दिल्ली येथे भरारी घेतली आहे. येत्या गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सांस्कृतिक कार्यक्रमात लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण प्रसंगी अपूर्वा गवळीचा सहभाग असून आज मंगळवार 13 ऑगस्ट रोजी दुपारी सुरत मार्गे ती नवी दिल्ली येथे रवाना होणार आहे.0अपूर्वा गवळी सोबत श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षिका चांदणी सपकाळे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील वडनगर येथील शाळेत यापूर्वीच प्रेरणा विद्यार्थिनी म्हणून महाराष्ट्रातून अपूर्वा गवळी हिची निवड झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन संवाद साधून अपूर्वा गवळीने आपले कर्तृत्व सादर केले. यातून केंद्रीय पथकाने प्रभावित होऊन महाराष्ट्रातील मोजक्या विद्यार्थिनी मधून नंदुरबारच्या अपूर्वा गवळीची निवड केली. म्हणून येत्या गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी अपूर्वा गवळीला आमंत्रित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.या कार्यक्रमासाठी अपूर्वा गवळीची निवड झाली असून तिला विशेष निमंत्रण आले आहे . याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांवर प्रभुत्व असलेल्या अपूर्वा गवळीच्या यशाबद्दल गवळी समाजासह शैक्षणिक क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.नंदुरबार येथील जयहिंद इलेक्ट्रॉनिक्सचे मॅनेजर किसन गवळी आणि अर्चना गवळी या दाम्पत्याची अपूर्वा कन्या, साक्री येथील आनंदा देवाजी बाचलकर यांची पुतणी असून राधाबाई घुगरे आणि प्रकाश घुगरे यांची नात आहे.