म्हसावद । प्रतिनिधी:
शहादा तालुक्यातील मलोणी येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक ललित बोरसे यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता (सेट) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
या परीक्षेसाठी ललित बोरसे यांचा मराठी हा विषय होता.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ललित बोरसे यांनी यश प्राप्त केले. सध्या ते जिल्हा परिषद शाळा, मलोणी ता. शहादा येथे कार्यरत असून शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवासी आहेत.
यापूर्वी त्यांनी मुंबई येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम. ए. इंग्रजी ही पदव्यूत्तर पदवीही उच्च श्रेणीत प्राप्त केलेली असून त्यांना जिल्हा परिषद, नंदुरबारचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुध्दा प्रदान करण्यात आलेला आहे.
शिक्षक बोरसे यांच्या यशाचे त्यांचे आई वडील,शहादा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. ममता पटेल,केंद्रप्रमुख सौ. अल्का जयस्वाल, केंद्रमुख्याध्यापक छगन रामोळे,मुख्याध्यापक पांडुरंग पाटील यांनी व सहकाऱ्यांनी कौतुक केले. ते चिमठाणे (ता.शिंदखेडा) येथील आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक एकनाथराव दामोदरराव बोरसे यांचे सुपुत्र आहेत.