नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि त्या संदर्भात अडचणी तसेच रखडलेले महामार्गाचे काम यासंदर्भात आज दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग आणि इतर प्रश्नांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील शिरपूर आणि सोनगीर येथील टोल हटवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली या दोघी टोल नाक्यांमधील अंतर 60 किलोमीटर पेक्षा कमी असल्याने या टोलनाक्यांवर टोल घेणे नियमात बसत नसल्याचे ही लक्षात आणून दिले त्याचप्रमाणे आठ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकाशा पुलाच्या कामाच्या संदर्भात होणारी दिरंगाई त्यांच्या लक्षात आणून दिला तसेच पिंपळनेर रस्ता, महामार्ग क्रमांक 753 ब आणि 752 जी बद्दल सद्यस्थितीची माहिती देऊन या मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात विनंती केली आहे.
नवापूर तालुक्यातील ओव्हरपास/फ्लायओव्हर रेल्वे क्रॉसिंग बाबत पत्र दिले. माननीय नितीन जी गडकरी यांच्याकडून या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सकारात्मक आश्वासन नितीनजी गडकरी यांनी दिले आहे.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यास खासदार गोवाल पाडवी यांनी सुरुवात केली असून त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे