नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातून पुणे येथे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून नंदुरबार इथून पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या संदर्भात असलेल्या अडचणी आणि मागण्यांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली मतदार संघातील रेल्वेच्या संदर्भात अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या काळात नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानक सुरत भुसावल मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वर जाण्यासाठी लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत असते त्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसवण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
रेल्वे क्रॉसिंग च्या ठिकाणी अंडरपास बनविण्यात आले आहेत मात्र या अंडर पासचे कामे निकृष्ट दर्जाचे असून त्यांची चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे पावसाळ्यात या बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी यासंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.