म्हसावद । प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे दाट धुके असल्याने 21 वर्षीय तरुणाचा सीताखालीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली.
तोरणामाळ येथे सीताखाईत २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी धुळे जिल्ह्यातील बोरपणी शिरपुर येथील भारत सरवरी पावरा वय वर्ष २१ हा तरुण आपल्या मित्रांसोबत थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला होता. मित्रांसोबत प्रत्येक पॉईंट वर सोबत फिरत होता. काहीवेळात मित्रांपासून पुढे चालत गेला. जो तो आपआपल्या मस्तीत दंग होता.नंतर सर्व घरी जाण्यासाठी परतीच्या मार्गावर निघाले. परंतु त्यात भारत त्यांना कुठेही मिळून आला नाही.सर्व मित्र भारत दिसुन येत नसल्याने चिंतातूर झाले. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला परंतु भारत मिळून आला नाही. आज मंगळवार ६ जुलै रोजी म्हसावद पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.
घटनेच्या गांभीर्य लक्षात घेत म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या सोबत पोलीस शिपाई राकेश पावरा, पो कॉ. प्रल्हाद राठोड, पो. कॉ. वसंत वसावे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पथक यांनी तोरणामाळ येथील स्थानिकांच्या मदतीने तसेच बोरपणी गावातील लोकांच्या मदतीने मृतदेह शोधून सीताखाई पॉईंट येथुन धबधब्याच्या खोल दरीतून गोणपाट व दोराच्या साहाय्याने बाहेर काढला. नातेवाईकांनी मृतदेह भारतचाच असल्याची ओळख पटली.शवविच्छेदणासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह बोरपाणी ता शिरपुर येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला