Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

५ वर्षे मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स दडपून ठेवणा-या जिल्हा समन्वयकाला सेवेतून काढा,बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

team by team
August 7, 2024
in राजकीय
0
५ वर्षे मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स दडपून ठेवणा-या  जिल्हा समन्वयकाला सेवेतून काढा,बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील २१ मंजूर वनदावे पैशांच्या अपेक्षेने तब्बल ५ वर्षे दडपून ठेवणा-या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक, वनजमीन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून तात्काळ काढून टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,आकाश तडवी,भावसार मोते,रवींद्र नावडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, दि.३१ मे २०१९ रोजीच्या जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत २१ वनदावे मंजूर करण्यात आले होते तसे वृत्तपत्रात देखील बातमी आली होती म्हणून त्या मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे संबंधित दावेदार यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दि.२ ऑगस्ट२०२४ रोजी देण्यात आले.सदर मंजूर वनदाव्यांची सखोल चौकशी केली असता तसेच संबंधित दावेदार यांनी वारंवार भेटुन विचारणा तपासणी केल्यावर त्यांची बोलण्याची भाषा आणि त्यांच्या वर्तनावरुन असे लक्षात आले की, हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांनी वनदावेदारांकडून पैसे मागणी केल्याने पैसे दिले नाहीत म्हणून वारंवार खोटे सांगून वेळ घेतला आणि आम्हाला जाणीवपूर्वक इतके वर्ष या कर्मचारी ने मानसिक त्रास दिला आहेत .मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स तब्बल ५ वर्षे दडपून ठेवल्या.या ५ वर्षाच्या कालावधीत हर्षल सोनार यांनी संबंधित दावेदारांना जिल्हा कार्यालयात वारंवार हेलफाटा मारायला लावल्या,५ वर्षे आदिवासी बांधवांच्या भावनांची खेळ केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजने सारखे अनेक विविध शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागले आहेत. आदिवासी बांधवांना फसवले.सदर मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे देण्याच्या कामी श्री.हर्षल सोनार यांनी हलगर्जीपणा करून पैशांच्या अपेक्षेने कर्तव्यात कसूर केलेली आहे.अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे वनदावेदारांचे हजारों वनदावे प्रलंबित आहेत. तसेच नंदुरबार जिह्यातील प्रत्येक तालुक्यातुन अनेक नागरिकांच्या यांचा विरोधात संघटनेला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत म्हणून प्रशासनावर वनदावेदारांचे आरोप होतात.

हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांच्या बेजबाबदारपणामुळे हजारों वनदावे प्रलंबित असून दावेदारांचा प्रशासनावर अविश्वास निर्माण होत आहे.म्हणून हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनजमीन शाखा यांना तातडीने पदावरून काढून टाकण्याची कारवाई करावी,अन्यथा याविरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनी बिरसा फायटर संघटना पुर्ण ताकदीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मंगेश वाघमारे सेट परिक्षा उत्तीर्ण

Next Post

शिक्षक भरतीमधील टीईटीची अट शिथिल करा. ट्रायबल फोरमची मागणी; शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add