नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार धुळे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त धडगांव तालुक्यात संसारोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. मागील काही वर्षांपासून संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढदिवस साजरा न करता सातपुडयातील आदिवासी बांधवांसोबत अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत आहेत.

शिवसेनेचे बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तोरणमाळ येथे सातपुडयाच्या डोंगरात उन्हातान्हात हिंडून फिरून वनौषधी गोळा करुन सिताखाई पॉईंटवर बसून आदिवासी बांधव विक्री करीत असतात. त्यांना ऊन पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांना छत्र्या वाटप केल्या. यावेळी तोरणमाळवासियांनी श्री.थोरात यांचे स्वागत येथील पारंपारिक पावा वाजवून केले. यानंतर रोषमाळ, वडफळ्या व जुनेधडगांव येथे गरजू लोकांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख, संजय उकिरडे, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमश्या पाडवी, उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य गणेश पराडके, विजय पराडके, जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम रघुवंशी,माजी सभापती धनसिंग पावरा,युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी अर्जुन मराठे, कुणाल कानकाटे, नगरसेवक सुनिल सोनार,
उपसभापती भाईदास अत्रे, तालुकाप्रमुख महेश पाडवी, विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे योगेश पाटील, गटप्रमुख जीवन रावताळे, उपसरपंच करमसिंग चौधरी, उपतालुकाप्रमुख दिलीप पाडवी, माजी सरपंच राजू पावरा, युवासेनेचे तालुका युवाधिकारी मुकेश वळवी, शहर युवासेनाधिकारी बंटी सोनवणे, पिंटा वळवी, पिंटू पावरा, बारदा पावरा, रणजीत चव्हाण, नारायण पावरा, सायसिंग वळवी, रीझवान बेलदार, दिलीप रावताळे, सोनू जव्हेरी, चेतनकुमार साठे व सद्दाम बेलदार आदि शिवसैनिक व युवासैनिकांनी परिश्रम घेतले.








