नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी काळात येणारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवासस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ गावागावात पोहोचवा, जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून द्या, तरुणांसाठी सुरू केलेली लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना सुविधा देणारे योजना तसेच अन्य सर्व योजना आणि लाभ आपापल्या गावात पोहोचवून तत्पर कार्य करावे, असे मार्गदर्शन या प्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी बूथ कमिटीचे काम पन्ना प्रमुख बुथ प्रमुख यांची कामे यासह माहिती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचला की नाही याची माहिती जाणून घेणे तसेच नागरिकांना महायुतीने राबविलेल्या योजनांची माहिती देणे यासह विविध गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला बैठकीला भारतीय जनता पक्षाचे श्याम मराठे, मोहन खानवाणी, आनंदा माळी, केतन रघुवंशी, धनराज गवळी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, सागर तांबोळी, राजेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.