नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राऊ दिलीपराव मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसे लेखी राजीनामा पत्र त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना दिले आहे.
राऊ मोरे यांनी सांगितले की, मी माझ्या वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत आहे. मी लवकरच माझी पुढील भुमिका स्पष्ट करणार आहे, असेही राऊ मोरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस पदासह पक्षाच्या सदस्यपदाचाही राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.