नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना ई भूमी अभिलेखचे रामदास जगताप यांनी अपशब्द वापरून अर्वाच्च भाषेत अपमान केल्याने नंदुरबार येथे तलाठी संघाने निदर्शने केली.असंविधानिक भाषा वापरणाऱ्या रामदास जगताप यांच्या विरोधात कारवाई न केल्यास दि.13 ऑक्टोबर पासून तलाठी संघाने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना व्हॉटसअप वरून रामदास जगताप ई भुमी अभिलेख प्रकल्प राज्य समन्वयक यांनी अपशब्द व अर्वाच्च भाषेचा शब्दप्रयोग करून अपमान केल्याने अशी असंविधानिक भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी यासाठी नंदुरबार तलाठी संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामदास जगताप यांच्यावर कारवाई न केल्यास दि. 13 ऑक्टोंबर पासून तलाठी संघाच्यावतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. यात निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे काम वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नंदुरबार तलाठी संघाचे अध्यक्ष राॅबिन गावित यांनी दिला आहे. त्याचबरोबर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसून ते महिन्याच्या 5 तारखेपर्यंत नियमित करावे, वेतनातून कमी केलेला भत्ता पूर्ववत करावा, कार्यालयीन खर्चाच्या निधीतून टेबल-खुर्ची व इतर फर्निचर देण्यात यावे, अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकार्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन देखील यावेळी सादर करण्यात आले. या समस्यांचे वेळेत निराकरण न झाल्यास तलाठी संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.








