नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. त्या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नवापूर रंगावली नदीला पुर आल्याने सकल भागातील घरात पाणी शिरले आहे.तसेच तालुक्यातील ग्रामीण भागाचा संपर्क तुटला असून राष्ट्रीय महामार्गा 6 वरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नवापूर शहरात व परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. नवापूर शहरातील जीवनदायीनी समजली जाणारी रंगावली नदी दोन्ही काठासह दुथडी भरून वाहत आहे. आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने पावसाच्या संततधार सुरू आहे नवापूर शहरातील इंदिरानगर, बजरंग चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा, देवळफळी, आदी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सकल भागातील घरात पाणी शिरल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अनेक ठिकाणी पावसामुळे संपर्क तुटला आहे.वीस पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यावर झाड उलमडून पडली आहेत. सकाळी काही काळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.
नवापूर तालुक्यातील रायपूर नेसू, सरफणी आदी नदीला पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. धायटा परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे. खांडबारा डोगेगाव रस्तावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांना जीवनदान मिळाले आहे. बळीराजा सुखावला आहे. गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता. त्या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रंगावली नदीला पूर आला आहे. नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे गुडघ्या एवढ्या पाणीत नागरिकांना मार्गस्थ होण्याची वेळ आली आहे याबाबत संबंधित राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने यावर ठोस उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नवापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने पहाटे रंगावली नदीला पूर आल्याने नवापूर शहरातील सकल भागात पाणी शिल्याने नागरिकांना पूर्ण रात्र जागून काढावी लागली. नवापूर तालुक्यातील नदी नाल्यांना देखील पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे मुसळधार पावसामुळे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे देखील काही अंशी नुकसान झाल्याचं पूर्वपट्ट्यामध्ये दिसून येत आहे.नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली आणि नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई चे मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.