नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते.
‘अनुभवावी वारी एकदा तरी ‘या संत महात्म्यांचा उक्तीनुसार ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराय तुकाराम ‘ या संतांचा गजर करत नंदुरबार करांनी साक्षात पंढरपूरच्या वारीच्या भक्तिमय सोहळा अनुभवला .
वारीच्या सुरुवातीला मुख्याध्यापक पंकज पाठक सर यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली. वारी शाळेच्या प्रांगणात आरंभ होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आपली श्रद्धा आणि भक्तीचे फुले अर्पण करून वारीची सांगता शाळेच्या प्रांगणात शिक्षक शिक्षककेतर वृंद व विद्यार्थी यांच्यातर्फे भक्तिमय वारीचे आणि ज्ञान कर्म भक्तीचे रिंगण सादर करून करण्यात आली .
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी, वासुदेव, जनाई अश्या प्रकारे विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या.
या वारीला शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यपक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर, विशाल मछले , देवेंद्र कुलकर्णी ,प्रशांत जानी, जगदीश बच्छाव,निलेश गावित, घनश्याम लांबोळे,प्रशांत पाटील, योगिता साळी, दुर्गा परदेशी, कमल चौरे यांनी परिश्रम घेतले.








