नंदुरबार l प्रतिनिधी
पंधरा वर्षांपुढील साऱ्यांना सर्वांना साक्षर करूया व निरक्षरतेचा कलंक मिटवू या , हा निर्धार मनाशी ठसवून साऱ्यांनी आषाढी वारी साजरी करावी असा संदेश मुख्याध्यापक सौ सुषमा शाह यांनी श्रॉफ हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात दिला.
वारकरी संप्रदायाने सबंध जगामध्ये एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त एकत्र होण्याचा संदेश घालून दिला आहे. याच परंपरेला अनुसरून श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई भक्तीची प्रतिकात्मक वारी आयोजित केली होती.
पारंपरिक सांस्कृतिक पोशाखामध्ये हातात भगव्या पताका घेऊन विद्यार्थ्यांनी विठ्ठल नाम घेत वारीची पाऊलवाट चालून दाखवली. विठ्ठल गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. विविध विठ्ठल गीतांना गाऊन विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. वृंदा गवळी व शर्वरी कुलकर्णी या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईच्या व्यक्तिरेखा सादर केली.
कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्याध्यापक सौ सुषमा शाह यांनी सांगितले की ,15 वर्षे आणि त्यापुढील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी आषाढी वारीत नव भारत साक्षरता या केंद्र पुरस्कृत उल्हास उपक्रमाचा प्रसार आणि प्रचार आळंदी देवस्थानच्या मदतीने करण्यात येतो आहे. पालखी मार्गावर वारी साक्षरतेची दिंडी काढली जाते आहे. सर्व विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा प्रचार करून निरक्षरतेला घालवण्यासाठी जिद्दीने कार्य करणे आवश्यक आहे. विठ्ठलाने नंदुरबारवर आभाळमाया बरसवून पाण्याने हा भाग रेलचेल करावा अशी आपण प्रार्थना करूया.
कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपमुख्याध्यापक श्री राजेश शाह,पर्यवेक्षक सौ जगदीश पाटील, सौ सीमा पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत शिक्षिका सौ अनघा जोशी ,श्री हेमंत लोहार ,सौ मनीषा कलाल , सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन श्री हेमंत पाटील यांनी केले.