नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील स्पर्श हॉस्पिटल, युवारंग व हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिसूळ हाडांची तपासणी शिबिर पार पडले. यावेळी सुमारे १३० जणांची तपासणी करुन त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
येथील डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे यांंनी रुग्णांची तपासणी केली. हाडांमधील कॅल्शियमची कमतरता, ठिसूळ हाडांबाबत समज-गैरसमज तसेच ठिसूळ हाडांमुळे महिलांना होणारा त्रास याबाबत रुग्णांनी घ्यावयाची काळजी व औषधोपचार याबाबत त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, प्रियंका पाटील, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, भावेश मंडलिक, शिवम गोस्वामी, आरती पाटील, सोनल शर्मा, पूजा जाधव आदी उपस्थित होते.