Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक विभागीय आयुक्तांना प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
July 11, 2024
in राजकीय
0
नाशिक विभागीय आयुक्तांना प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन

म्हसावद । प्रतिनिधी:

जिल्हा परिषद नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नंदुरबार जिल्हा प्राथमिक प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रलंबित प्रश्न बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी तातडीच्या प्रश्नी कार्यवाहीबाबत नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

 

या मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभाग जि.प. शिक्षणाच्या डिजिटायजेशनचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर आहे. त्याच वेळी पायाभूत सुविधांचा प्रश्नही मोठा आहे. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. आदिवासी व दुर्गम भागात स्थानिक बोली भाषा वेगळी असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत येणारी अडचण विचारात घेवून त्यात सुलभता आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधना येण्याकरीता स्थानिक बोली भाषा अवगत असलेल्या शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्याबाबतच्या भरती करण्यात यावी.

 

आदिवासी भागात आजही शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पदे रिक्त आहेत. या प्रश्नांकडे आता विशेष लक्ष दिले जावे. शासनाने रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे. शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

 

हजारो किलोमीटर अंतरावर कुटुंबापासून दूर राहून सेवा करणाऱ्या शिक्षकांसाठी ३ ऑक्टोबर २०२३ रोजी शासनाद्वारे शासन निर्णय करून अशा शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदेने एक आगाऊ वेतनवाढ देणे संदर्भात आदेशित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता नव्याने गृहीत धरल्याने ते बदलून आलेल्या जिल्हा परिषदेत सेवा कनिष्ठ ठरतात त्या बदल्यात शासनाने त्यांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचे ठरविले आहे. या शासन निर्णयानुसार जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बदलून नंदुरबार जिल्हा परिषदेत आलेले आहेत, त्यांना अद्यापपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली नाही. यामुळे हजारो अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकावर अन्याय होत असल्याची बाब यावेळी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त यांचेसमोर मांडली. याबाबत लवकरच जिल्हा परिषद नंदुरबार ला आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आश्वासन दिले. शासन निर्णय दि. २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून दुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी.

 

 

अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे.भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याच्या पगारातून जीपीएफ कपात करण्यात आलेली रक्कम आहे. जोपर्यंत कर्मचारी नोकरी करत असतो तोपर्यंत त्याच्या पगारामधून जीपीएफ कपात होत राहते. नोकरी सोडल्यावर अथवा बदल झाल्यांनतर जीपीएफ खाते ट्रान्सफर करणे किंवा ते बंद करता येते व त्या तारखेपर्यंतची सर्व रक्कम व्याजासह कर्मचाऱ्याच्या मिळते. ही रक्कम करमुक्त असते. वेळेवर पैसे काढण्याचा पर्याय ईपीएफओ खात्याचा वापर बँक खात्याच्या रूपात वापर करता येत नसला तरी, वैद्यकीय उपचारांसह, गृह कर्ज परतफेड आणि शैक्षणिक खर्च यासारख्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादेंतर (५ ते १० वर्षे) आंशिक पैसे काढण्याची सुविधा आहे. परंतु चार वर्षापासून हिशोब पावत्या मिळाल्या नसल्यामुळे शिक्षकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. दरवर्षी अखेरपर्यंतच्या हिशोब पावती देणे बंधनकारक आहे.

 

 

अशैक्षणिक कामापासून सुटका व्हावी. इतर मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य, शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्राथमिक प्रहार शिक्षक संघटना नेहमीच पुढाकार घेत आहे. सध्या प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमुळे अनेक शिक्षकांच्या तसेच प्राथमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, जि. प. प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाकडूनही सकारात्मक सहकार्य मिळत आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन, प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. भविष्यातही शिक्षकांच्या प्रश्नी तत्पर राहू असंही मत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित यांनी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी 16 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन : खा.ॲड गोवाल पाडवी

Next Post
जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी 16 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन :  खा.ॲड गोवाल पाडवी

जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी 16 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन : खा.ॲड गोवाल पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

August 28, 2025
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

August 28, 2025
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

August 28, 2025
शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

August 28, 2025
रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

August 28, 2025
अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

August 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group