नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा. खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास 5000 गरीब गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि खोंडामाळी येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
भालेर आणि खोंडामाळी येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आणि त्यानंतरही ग्रामस्थांकडून डॉक्टर हिना गावित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वही वाटप उपक्रमाचे ज्यांनी आयोजन केले ते जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, श्रीमती कपू पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भालेरचे संस्था अध्यक्ष भास्कर पाटील व अन्य उपस्थित होते.
दरम्यान या उपक्रमाच्या माध्यमातून क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय भालेर या शाळेतील 500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी 5 प्रमाणे 2 हजार 500 वह्या वाटप करण्यात आले. नूतन विद्यालय खोंडामळी येथे 200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी 5 प्रमाणे 1000 वह्या वाटप तर, गायत्री माध्यमिक विद्यालय खोंडामळी शाळेतील प्रमाणे 200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी 5 प्रमाणे 1000 वह्या वाटप करण्यात आल्या. माजी जि.प.सदस्य भिका पाटिल प्रल्हाद पाटिल नगावचे शाणाभाऊ धनगर बोराळ्याचे सरपंच नारायण भाई हाटमोईदाचे उपसरपंच गौरव जमादार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.