Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आज होणारे एक दिवस शाळा बंद आंदोलन तुर्तास स्थगित,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

team by team
June 29, 2024
in राजकीय
0
आज होणारे एक दिवस शाळा बंद आंदोलन तुर्तास स्थगित,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

नंदुरबार l प्रतिनिधी-
शिक्षण संस्था महामंडळातर्फे आज दि.२९ जून २०२४ रोजी राज्यभर पुरकारण्यात आलेले ‘एक दिवस शाळा बंद आंदोलन’ काही दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कार्यवाही तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावीत, नाशिक विभागीय कार्यवाह प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे यांनी दिली आहे.

 

पाच वर्षापूर्वी शिक्षण संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार शाळांना वेतन आयोगानुसार अनुदान देण्यात यावे, याबाबत न्यायालयाने संस्थांच्या बाजुने निकाल दिला. त्यानंतर शासनाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळटाळ केली. तसेच भरती पोर्टलमधील सुधारणेसाठी समिती नेमून त्यात संस्था चालकांना सहभागी करुन घ्यावे, माध्यमिक विद्यालयासाठी १० किलो वॉट व महाविद्यालयासाठी २५ किलो वॉटचे सोलर ऊर्जा शासन खर्चाने बसवावे,

 

ग्रामीण भागातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या शिक्षकांना वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा आग्रह धरु नये आदी मागण्यासाठी शिक्षण संस्था महामंडळातर्फे आज दि.२९ जून २०२४ रोजी राज्यभर पुरकारण्यात आलेले ‘एक दिवस शाळा बंद आंदोलन’ पुकारण्यात आले होते. परंतू मंत्री महोदयांनी अधिवेशन काळात शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्यासह शिष्ठमंडळाची बैठक घेवून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच नवीन शिक्षण सचिव श्रीमती कुंदन, उपसचिव तुषार महाजन यांच्याशी देखील सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सदरील एक दिवस शाळा बंद आंदोलन काही दिवस स्थगित करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शबरी आदिवासी घरकुल योजनेतील आदिवासी लाभार्थ्यांना पालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देण्याची शिवसेना उबाठा पक्षातर्फे मागणी

Next Post

शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Next Post
शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add