नंदुरबार l प्रतिनिधी
खरीप हंगाम 2023 मधील अल्पपर्जन्यपवृष्टीमुळे नंदुरबार तालुका पुर्ण दुष्काळी जाहीर केल्यामुळे तालुक्यातील 28 हजार 358 शेतकरी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान जमा करण्यात आले असल्याचे तहसिलदार नितीन गर्जे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ज्या शेतकरी खातेदार लाभार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती तलाठी यांच्याकडे दिली नसेल त्यांनी 29 जून 2024 पूर्वी आवश्यक ती कागदपत्रे आपल्या गावाच्या तलाठी यांच्याकडे जमा करावीत. तसेच ज्या लोकांची ई-केवायसी बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी 27 जून 2024 पुर्वी सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी झाल्याशिवाय अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तसेच 29 जून 2024 नंतर नांवे, कागदपत्रे दिल्यास अशा शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही असेही तहसिलदार श्री. गर्जे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.