नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुका आदिवासी समाजा च्या विविध पक्ष आणि संघटनांनि पिंपळनेर येथे नवापूर तालुक्यातील आदिवासी महिले सोबत सामूहिक अत्याचार झालेल्या घटनेचा निषेधार्थ दि.31 मे रोजी बंद आवाहन केले आहे
पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे येथे आदिवासी महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होणे बाबत चे निवेदन नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्यय समिती तहसिलदार प्रशांत कुलकर्णी,प्रभारी पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना दिले आहे-
दिनांक २७.०५.२०२४ रोजी ११:३० वाजता पिंपळनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे नवापूर तालुक्यातील महिलेवर सामुहिक बलात्कार झाला आहे. बलात्कार करणारे दोन व्यक्ती असून त्यांना पोलीस विभागाने अटक केलेली आहे परंतु, या नराधमांना सोडण्यात येऊ नये यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरुन ही शिक्षा कायम त्यांच्या स्मरणात राहील व यापुढे कोणीही असे कर्म करणार नाही, पाऊल उचलणार नाही तसेच अशी हिम्मत देखील इतर कोणी भविष्यात करणार नाही करीता या नराधमांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
या नराधमांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हावी बाबत आपण आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी अशी आम्ही या घटनेचा सर्व आदिवासी संघटनेमार्फत निषेध करीत आहोत असे निवेदना मध्ये म्हटले आहे.
निवेदनावर नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्यय समिती आमदार शिरीषकुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी कारखाना चेअरमन भरत गावीत,माजी नगराध्यक्ष गिरीष गावीत,माजी पं.स सभापती दिलीप गावीत,अरविंद वळवी,विलास गावीत,नितेश गावीत,आयुब गावीत,वनिस गावीत,दिलीप गावीत, आदीचा सह्या आहेत.
या प्रसंगी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्यय समिती,तर्फे पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे येथे आदिवासी महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होणे या संदर्भात नवापूर तालुका दि ३१ मे २०२४ रोजी बंद ठेवण्या बाबत पण निवेदन तहसिलदार नवापूर, प्रभारी पोलिस निरीक्षक तसेच मर्चंट सेवा असो .व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांना देण्यात आले आहे़.