नंदुरबार l प्रतिनिधी
नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीतील सौर उर्जा यंत्रणा मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली आहे. १३५ किलोवॅट वीजनिर्मिती होत असलेल्या या यंत्रणेमुळे वीजबिला पोटी खर्च होणा-या निधीची बचत होणार असून न.प. चा वार्षिक सुमारे तीस लाख रुपयांचा फायदा होणार आहे.
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून अपारंपरिक उर्जानिर्मिती करणे हा पर्यावरण पूरक उपक्रम आहे. अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात नंदुरबार नगरपरिषद सातत्याने आघाडीवर असते. नगरपरिषदेच्या मालकीच्या विविध इमारतींवर यापूर्वीच सौर ऊर्जा संयत्रांची उभारणी करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी लेखाधिकारी वैशाली जगताप, प्रशासन अधिकारी जयसिंग गावित, नगर अभियंता गणेश गावीत, उपअभियंता ईश्वर सोनवणे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अभिजित मोहीते, आरोग्य विभाग अभियंता विशाल कांमडी, विद्युत अभियंता राकेशकुमार वाडीले, विद्युत विभागाचे राजेश श्रीमाल, राजेश परदेशी ,सुभाष मराठे , निखिल देवरे, हिमांशू परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.