नंदुरबार l प्रतिनिधी
पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भिल यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. सर्वांना संधी मिळावी यासाठी ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार त्यांनी राजीनामा दिला.
नंदुरबार पंचायत समितीत सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती व उपसभापती पदासाठी ८ महिने ते वर्षभरासाठी फॉर्म्युला ठरवलेला आहे. त्यानुसार,विद्यमान सभापती दीपमाला भील यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांना राजीनामापत्र पाठवले. राजीनामा पत्र उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी स्वीकारले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सभापती संगीता गावित,हेमलता शितोळे,शंकर पाडवी,माजी उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड.राम रघुवंशी,सदस्य देवमन पवार उपस्थित होते.
राजीनामा मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होईल.नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात पार पडणार आहेत.