Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती मालामाल, 5 कोटींचे मिळाले रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न; दीड कोटींच्या झाला नफा

team by team
May 18, 2024
in राजकीय
0
नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती मालामाल, 5 कोटींचे मिळाले रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न; दीड कोटींच्या झाला नफा

नंदुरबार l प्रतिनिधी

यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला ५ कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेले आहे. त्यातून 1 कोटी 68 लाख रुपयांच्या नफा झालेला आहे. प्रथमस्थानी सर्वसामान्य शेतकरी हित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि शेतमजूर,संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी त्यांच्या सहकार्यातून झालेल्या भरभराटी बद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संचालक मंडळाच्या सत्कार केला.

 

 

खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषीमालांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.मिरची,कांदा,कापूस,धान्य, भाजीपाला खरेदी विक्रीतून बाजार समितीला फायदा झालेला आहे. दि.1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 अखेर 5 कोटी 36 लाख 54 हजार 193 रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. त्यातून 3 कोटी 67 लाख 86 हजार 763 रुपये खर्च झाला असून,1 कोटी 68 लाख 67 हजार 430 रुपये घसघशीत नफा मिळालेला आहे.

 

 

आर्थिक भरभराटी बद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती विक्रमसिंह वळवी, उपसभापती वर्षा पाटील, सचिव योगेश अमृतकर व संचालक मंडळाच्या आमदार कार्यालयात सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माझी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,संचालक नवीन बिर्ला, दीपक मराठे,किशोर पाटील,गोपीचंद पवार,लकडू चौरे,गिरीश जैन,ठाणसिंग गिरासे,प्रकाश माळी, विजय माळी,राजेश गावित,गजानन पाटील,दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.

 

कांदा,मिरचीतून उत्पन्न

परिसरात कांदा व मिरची अन्य मालांचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत दररोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्याच्या परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

 

सुयोग्य नियोजन; शेतकरी हिताचे घेतले निर्णय

मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचा गटाची सत्ता आहे. संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन,काटकसर शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय व शेतमजूर, हमाल-मापाडी, व्यापाऱ्यांचे अनमोल सहकार्यातून बाजार समितीला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत.

चंद्रकांत रघुवंशी
शिवसेना नेते (शिंदे गट),माजी आमदार

 

असे मिळाले उत्पन्न

✓ बाजार फी- 3 कोटी 75 लाख 49 हजार 215.75

✓ भांडवल उत्पन्न- 86 लाख 65 हजार 112.12

✓अनुज्ञप्ती फी- 29 हजार 545

✓ इतर उत्पन्न- 28 लाख 38 हजार 661.48

✓ जनावरे इतर फी- 14 हजार 626.50

✓ गुंतवणुकीवरील उत्पन्न- 45 लाख 47 हजार 63

 

असा झाला खर्च

✓ एकूण खर्च- 3 कोटी 67 लाख 86 हजार 763

✓ नफा- 1 कोटी 68 लाख 87 हजार 430

बातमी शेअर करा
Previous Post

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी सामुहिक सुरक्षा अपघात विमामुळे कुटुंबीयांना मिळाला पाच लाख 10 हजाराचा मिळाला धनादेश

Next Post

राजकीय दौरे अर्धवट सोडून शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली ‘अवकाळी’चा तडाखा बसलेल्या गावांना तातडीने भेट

Next Post
राजकीय दौरे अर्धवट सोडून शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली ‘अवकाळी’चा तडाखा बसलेल्या गावांना तातडीने भेट

राजकीय दौरे अर्धवट सोडून शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली 'अवकाळी'चा तडाखा बसलेल्या गावांना तातडीने भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add