नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी 10 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे.
या प्रचार सभेचे ठिकाण नंदुरबार शहरालगत असलेल्या चौपाळे शिवारातील अहिंसा स्कूल समोरील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले आहे.यावेळी सुमारे 1 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत.








