नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी विभागाने मोठी धडक कारवाई करीत अक्कलकुवा तालुक्यातील खापर जवळ 15 लाखांचे महाराष्ट्रात प्रतिबंधित बोगस बियाणेसह 30 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात बंदी असलेले कापसाचे एच.टी. बी. टी.एच.टी.बी. टी बियाणे जात होते याबाबत माहिती मिळाल्याने 1मे रोजी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषि विकास अधिकारी किशोर हडपे,मोहीम अधिकारी सचिन देवरे ,जिल्हा गुन नियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके ,तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी व कृषि अधिकारी प्रकाश खरमाळे, शयोगेश हिवराळे यांच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील खापर जवळ कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचे बोगस एच टी बी टी. योध्दा नामक बोगस बियानाचे 1000 पाकीटे हस्तगत करीत 15 लाखाच्या गाडीसह तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे .
याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक विभागातील सर्वात मोठी हंगामातील पहिली कारवाई असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.