Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठे कालीन तोफेला प्राप्त झाले गतवैभव, हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश

team by team
April 27, 2024
in राजकीय
0
मराठे कालीन तोफेला प्राप्त झाले गतवैभव, हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश

नंदुरबार l प्रतिनिधी
येथे मराठेकालीन पुरातन तोफ अस्तित्वात होती सदर तोफ शासकीय विश्रामगृहात होती. त्याची झालेली दुरावस्थासंदर्भात हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील आणि समितीचे धर्मसेवक यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सा.बां.वि. यांना जानेवारी महिन्यात निवेदन देऊन त्या तोफेची दुरुस्ती करून त्याला सन्मानाने ठेवावे, समय मर्यादेत पुरातन तोफेच्या गतवैभव प्राप्त करून न दिल्यास उपोषणाचा आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. हिंदु सेवा सहाय्य समितीने दिलेल्या इशाऱ्यानंतर सा.बां.वि. ने तोफेची दुरुस्ती करून सा.बां.वि. नवीन कार्यालयात बुरुज बनवून त्याठिकाणी तोफेला सन्मानाने ठेवले. हिंदु सेवा सहाय्य समितीने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि.१६ जानेवारी रोजी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठेकालीन पुरातन तोफ अत्यंत खराब व दयनीय अवस्थेत शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहाचा मागील बाजूस ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणी आढळून आली. इतिहासाची साक्ष देणारी ही मराठेकालीन तोफेची अशी अवस्था पाहून हा इतिहासाच्या अपमान आहे हे लक्षात घेऊन यासंदर्भात हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी समितीच्या फेसबुक अकाउंट वरून लाईव्ह करून यासंदर्भात हिंदु समाजातील लोकांना माहिती दिली आणि यासंदर्भात दि.१६/१/२४ रोजी हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले .

निवेदन दिल्यानंतरही त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक यांनी ऐतिहासिक तोफेची काळजी न घेतल्यास उपोषण करण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर संबंधित अधिकारी यांनी सदर तोफेची डागडुगी, दुरुस्ती करून सा. बां. वि. च्या नवीन कार्यालय परिसरात एक नवीन बुरुज बनवून त्यावर सदर तोफे ठेऊन गतवैभव प्राप्त करून दिले. हिंदू सेवा सहाय्य समितीच्या पाठपुराव्यामुळे मराठेकालीन तोफेला गतवैभव प्राप्त झाल्यामुळे समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, उज्वल राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, सुयोग सुर्यवंशी, जयेश भोई यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील पहिला उपक्रम: श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालयात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचे उद्घघाटन

Next Post

ब्रेकिंग न्यूज:अखेर डॉ.हिनाताई गावित व शिवसेनेचे जिल्हा नेते मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे झाले मनोमिलन ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add