नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्यावतीने जागतिक स्तरावर युरोपातील फिनलँड या देशात दि.८ ते १४ मे २०२४ दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेकरिता भारतातील दहा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू राजश्री गोकुळ राठोड हिची फ्लोअरबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी संस्थेच्यावतीने २५ हजार रोख बक्षीस राजश्रीला दिले आहे. तसेच यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शालेय परिवारातर्फे २१ हजाराची देखील राजश्रीला मदत करण्यात आली आहे.
राजश्री राठोड हिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रोहतक (हरियाणा) येथे घेण्यात आलेल्या शिबिरातून भारतीय संघात निवड झाली आहे.
नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातून युरोपीय देशांमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविणारी राजश्री राठोड ही पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या या निवडीबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, पर्यवेक्षक विलास पाटील, पालक गोकुळ राठोड यांनी अभिनंदन केले आहे. राजश्री राठोड हिला प्रा.डॉ.मयुर ठाकरे, भरत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.