नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना मत म्हणजे विकासाला मत, डॉ. हिनाताई गावित यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत; हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने मतदान करावे; असे जाहीर आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केले आणि ‘अब की 400 पार’ चा नारा दिला.
महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी 25 एप्रिल 2024 रोजी नंदुरबार तालुक्यातील खोकराळे परिसरात दौरा केला. प्रत्येक वसाहत प्रत्येक चौकात फिरून ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. देशाचे हित जपण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहे असे सांगतानाच डॉ.सुप्रिया गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा. डॉ.हिनाताई गावित यांनी केलेला विकास सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना मत म्हणजे विकासाला मत, डॉ. हिनाताई गावित यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत; हे त्यांनी विशद केले. याप्रसंगी त्यांच्या समावेत भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख जे.एन.पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र राजपूत आणि स्थानिक पदाधिकारी तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.